कणकवली (प्रतिनिधी) : एक छोटासा रक्तदानाचा क्षण कोणाच्या तरी आयुष्यासाठी नवी आशा ठरू शकतो, या भावनेतून स्वस्तिक फाउंडेशन संचालित दिविजा वृद्धाश्रम, असलदे येथे ‘रक्तदान – जीवनदान’ या सामाजिक उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर दिनांक २६ जानेवारी, २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत आयोजित करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
आजच्या काळात अपघात, शस्त्रक्रिया, गंभीर आजार तसेच प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज भासते. अशा वेळी रक्ताचा तुटवडा अनेक रुग्णांसाठी जीवघेणा ठरतो. ही गरज लक्षात घेऊन दिविजा वृद्धाश्रमाने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी स्वस्तिक फाउंडेशन – ७७५७९८६९९८ किंवा अविनाश फाटक – ९८२०२१८२६९ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.












