जनसुविधा योजनेतून सुमारे १० लाख रुपये मंजूर
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगावणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणारा बेर्ले वरची राऊतवाडी या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ नुकताच सिंधुदुर्ग जि.प.चे माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून व शासनाच्या जनसुविधा योजनेतून सुमारे १० लाख रुपये मंजूर करण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे, माजी सरपंच सरिता पवार, ग्रामपंचायत सदस्य बबलू पवार, विशाखा राऊत, रवींद्र राऊत, अक्षता सादीकले, स्नेहा गोसावी यांसह स्थानिक ग्रामस्थ चिमाजी राऊत, मधुकर राऊत, प्रताप राऊत, विश्वनाथ राऊत, रंजना राऊत, विजय राऊत, विलास राऊत, प्रकाश राऊत, विद्याधर राऊत, राजाराम राऊत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.













