जि.प./पं.स निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट उबाठा गटाकडून उमेदवारांची चाचपणी ! सहा जण इच्छुक मात्र नावे गोपननिय !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जि.प. आणि पं.स.उमेदवार चाचणीची प्रक्रिया सर्वच पक्षातून सुरू झाली आहे. कधीही निवडणुकीची घोषणा लक्षात घेता, स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत उबाठा ची एक बैठक घेण्यात आली. यामध्ये इच्छुक उमेदवारांनी आपले विचार व्यक्त करताना काही सूचनाही केल्या. यावेळी जि. प.ला दोन आणि पंचायत समिती करिता चार उमेदवारांनी आपण इच्छुक असल्याचे सांगितले.अर्थात बिनविरोध उमेदवार निवड आणि घोडेबाजार पाहता नावे गोपनीय ठेवण्याचा आणि बैठकीचा अहवाल श्रेष्ठीकडे पाठविण्याचा निर्णय उबाठा शहर अध्यक्ष राजा पाटकर आणि सुरेश टक्के यांनी जाहीर केला. यावेळी शामराव भुवड, साहिल भुवड, राजेंद्र मोरये, राजेंद्र पावसकर, बंडू मरिये, बंटी ऊरणकर, माधवी दळवी, सौ. अवसरे, संजना कोलते, विठ्ठल लाड, बाळा येळवकर, पंढरी सामंत, राजा साटम, दूर्वा गोसावी, पूर्वा साटम, सतीश मेस्त्री, सुरेश मेस्त्री आणि पंचक्रोशीतील अनेक उबाठा सैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!