वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या प्रशालेत कर्मचारी वर्गासाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : सध्याच्या या धावपळीच्या काळात बदलती जीवनशैली व वातावरणातील सततच्या बदलामुळे त्याचे मानवी प्रकृतीवर परिणाम होताना दिसून येत आहेत. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्या व्यक्तीच्या दैनंदिन कामावर होत असतो ही बाब लक्षात घेऊन वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र वैभववाडी यांच्या मार्फत संस्थेच्या अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गासाठी प्रशालेत विशेष वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून रक्तदाब, रक्त तपासणी, शुगर, ईसीजी व अन्य तपासणी करण्यात आल्या.

यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी‌. एस. नादकर, डॉ. समीर माने, नम्रता कविटकर, श्रावणी कांबळी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!