ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे च्या यज्ञा भूषण सुतारला राज्यस्तरीयत तायक्वांदो स्पर्धेत कांस्यपदक

कणकवली (प्रतिनिधी) : ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडेची विद्यार्थिनी यज्ञा भूषण सुतार हिने राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत कांस्यपदक मिळवत आयडियलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. इयत्ता तिसरी मध्ये शिकत असणाऱ्या यज्ञाने जिल्हा व विभाग स्तरावर आपल्या उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन करत राज्यस्तरावर झेप घेतली व आपल्या खेळातील सातत्य कायम ठेवत राज्यस्तरावर ही यश प्राप्त केले.

या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष मोहन सावंत, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, सचिव प्राध्या. हरिभाऊ भिसे, सहसचिव प्राध्या. निलेश महिंद्रकर, खजिनदार शीतल सावंत, सल्लागार डी. पी. तानावडे, मुख्याध्यपिका अर्चना शेखर देसाई, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!