आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शासकीय रेखाकला परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेला एकूण १३ विद्यार्थी बसलेले होते. ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेस एकूण १७ विद्यार्थी बसले होते, ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. दोन्ही परीक्षांचा १००℅ निकाल लागला असून एलिमेंटरीमध्ये किरण नंदकुमार सावंत हिने ‘ए’ श्रेणी, तर इंटरमिजिएट मध्ये भूषण सुरेश मसुरकर याने ‘ए’ श्रेणी मिळविली. दोन्ही परीक्षेमध्ये २-२ विद्यार्थी ‘बी’ श्रेणीत, तर एलिमेंटरी मध्ये १० विद्यार्थी ‘सी’ श्रेणीत व इंटरमिजिएट मध्ये १४ विद्यार्थी ‘सी’ श्रेणीत उत्तीर्ण झालेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानदीप संस्था, सर्व संस्था सदस्य वायंगणी व मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक संजय जाधव, सेवानिवृत्त कलाशिक्षक आचरेकर, मोरेश्वर गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभू, सचिव वैभव जोशी, खजिनदार समृध्दी आसोलकर तसेच सर्व संस्था सभासद, सरपंच रुपेश पाटकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
शासकीय रेखाकला परीक्षेत वायंगणी हायस्कूलचे यश












