सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कुणकेश्वर आणि आंगणेवाडी या जत्रा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत या जत्रांना राज्यातून देशातून तसेच मुंबईतून मोठ्या प्रमाणात चाकरमानी वर्ग हजेरी लावतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्थानिक ग्रामस्थ आणि देवस्थान कमिटी यांच्याशी चर्चा करून नियोजनामध्ये कोणताही अभाव राहता कामा नये अशा सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत. किंबहुना गेल्या वर्षापेक्षा यावर्षी या जत्रांचे नियोजन अधिक चांगले व्हावे नागरिकांच्या गैसोयी कमी व्हाव्यात या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समावेत त्या त्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते प्रामुख्याने मोबाईल नेटवर्क तसेच रस्त्यांची दुरुस्ती याबाबत विशेष सूचना करून कामे मार्गी लावण्याचे यावेत असे या बैठकीत सांगण्यात आले.
आंगणेवाडी कुणकेश्वर आढावा बैठक












