सिंधुदुर्गच्या वारकऱ्यांसाठी पंढरपूरला वारकरी भवन उभारणार – मंत्री नितेश राणे

पंढरपूरमध्ये सिंधुदुर्गच्या वारकऱ्यांना हक्काचे निवासस्थान; दोन–तीन वर्षांत वारकरी भवन साकारणार

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारकऱ्यांना पंढरपूर येथे आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मी प्रयत्नशील आहे. खासदार नारायण राणे यांच्याशी चर्चा देखील करणार आहे. पंढरपूर येथे जागा घेतली आहे. त्याठिकाणी येत्या दोन ते तीन वर्षांत वारकरी भवन उभारण्यात येणार आहे. या वारकरी भवनामध्ये निवास व्यवस्था, भोजन, स्वच्छतागृहे तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, पंढरपूर वारीच्या काळात तसेच इतर वेळीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येणाऱ्या वारकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही मंत्री नीतेश राणे यांनी सांगितले.

error: Content is protected !!