कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत युवासेना चषक–२०२६ अंतर्गत भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १७ व १८ जानेवारी, २०२६ या कालावधीत ही सभा कणकवली तालुक्यातील दारिस्ते, गावकरवाडी येथे पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश फी ५०० रुपये ठेवण्यात आली असून विजेत्या संघांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक ७,७७७ रुपये व भव्य चषक, तर द्वितीय पारितोषिक ५,५५५ रुपये व भव्य चषक असे आहे. तसेच मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज यांना स्वतंत्र चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच भव्य लकी ड्रॉ च्या द्वारे आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धा हँडलॉक पद्धतीने खेळवण्यात येणार असून पंचांचा निर्णय अंतिम राहील. खेळताना झालेल्या दुखापतीस आयोजक मंडळ जबाबदार राहणार नसल्याचे नियम व अटींमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांसाठी सहदेव गावकर (८९७५८९७३१५), प्रतीक गावकर (८२७५२६२४३१) आणि सुजल गावकर (९३०७०८२२३०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.












