जिल्हा परिषद निवडणुकीची तारीख 18 जानेवारीला घोषित होण्याची शक्यता – सूत्राची माहिती…

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे, त्यात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदांचा समावेश आहे….

उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुका न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार आहेत.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून, त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे….

राज्यात निवडणूक रखडलेल्या ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्या आहेत. यापैकी २० जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत ८८ पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक आहे. तिथल्या निवडणुका पुढील निर्णयापर्यंत न घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. २१ जानेवारीला सुनावणी आहे.

error: Content is protected !!