कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाट यांच्या वतीने आयोजित भव्य टेनिस बॉल जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन फोंडाघाट येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद पारकर, श्री. सावंत, गणेश लाड, राजेंद्र बागवे, श्री. रासम, श्री. फड यांच्यासह प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच रमेश राणे, देवेंद्र पिळणकर, निलेश रावराणे, महेश चव्हाण, उत्तम तेली, राजू वाघाटे, बाळा मसुरकर, तुषार पिळणकर, पार्थ पिळणकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील विविध शाळा व ज्युनिअर कॉलेजमधील सहभागी संघांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोंडाघाट येथे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या हस्ते उद्घाटन












