पुढील होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आणि शेठ. न. म. विद्यालय खारेपाटण सिंधुदुर्ग, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मुख्यालय ओरोस येथे स्तरावर विभाग स्तरावर संपन्न झालेल्या ‘हाफकिडो बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत’ खारेपाटण येथील शेठ न.म.विद्यालय खारेपाटणच्या विद्यार्थांनी नेत्रदीपक कामगिरी करत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
गुरुवार दि.८ जानेवारी, २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे संपन्न झालेली ‘हापकिडो’ ही एक कोरियन मार्शल आर्ट असून ती लांब पल्ल्याच्या आणि जवळच्या लढाईच्या तंत्रांचा वापर या क्रीडा प्रकारात केला जातो. यावेळी हापकिडो बॉक्सिंग महाराष्ट्र राज्य सचिव राज वागतकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक माधुरी घराळ, राष्ट्रीय पंच प्रिया डावरे, खारेपाटण कॉलेजचे प्राचार्य संजय सानप आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध वजनी गटात व वयोगटात या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये खारेपाटण हायस्कूलच्या खालील वयोगटातील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे.
वजन गट ४६ किलो मुले – अरुण गणेश जामसंडेकर (प्रथम क्रमांक),
वजन गट ४९ किलो मुले – सम्मेद अजित उपाध्ये (प्रथम क्रमांक),
वजन गट ६१ किलो मुले – सोहम राजेंद्र पवार (प्रथम क्रमांक),
वजन गट ६७ किलो मुले – अहमद रजा फैयाज पावसकर (प्रथम क्रमांक),
वजन गट ६४ किलो मुले – अजय आप्पा हिप्परकर (द्वितीय क्रमांक),
वजन गट ३९ किलो मुली – त्रिवेणी विशाल परब (प्रथम क्रमांक),
वजन गट ४२ किलो मुली – अनुष्का ज्ञानेश्वर गाडे (प्रथम क्रमांक),
वजन गट ४५ किलो मुली – अनुष्का संतोष धुवाळी (प्रथम क्रमांक),
वजन गट ४८ किलो मुली – रिया दीपक वाघरे (प्रथम क्रमांक),
वजन गट ५१ किलो मुली – तेजस्वी प्रवीण मिशाळ (प्रथम क्रमांक),
वजन गट ५४ किलो मुली – सानिका टोपाणा गावडे (प्रथम क्रमांक),
वजन गट ६० किलो मुली – सानिका सतीश पवार (प्रथम क्रमांक),
वजन गट ६३ किलो मुली – श्रावणी शिवाजी कानडे (प्रथम क्रमांक) या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील क्रीडा शिक्षक श्री. पाडवी आणि श्री. भिसे यांचे मार्गदर्शन लाभले. तर या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांचे विशेष सहकार्य लाभले. दक्षिण आशिया टेकयान महासंघाचे महासचिव ऍड. राज वागदकर आणि जिल्हा हापकिडो बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष संजय सानप यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या क्रीडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, सर्व विश्वस्त, प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व शिक्षक वृंद आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.












