नाटळ गावात उ.बा.ठा. सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : नाटळ गावातील उ.बा.ठा. सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी विद्यमान नाटळ ग्रामपंचायत सदस्य पद्माकर पांगम, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान संचालक नाटळ शरद खोचरे, सचिन खोचरे,सचिन निकम यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून भाजपची ताकद वाढवली .

या पक्षप्रवेश प्रसंगी भाजप मंडळ उपाध्यक्ष विजय भोगटे, नाटळ सरपंच सुनील घाडीगावकर, किशोर परब, उपसरपंच तायशेटे काका, डॉ. हेनरी चोडणेकर,बूथ कमिटी अध्यक्ष महेश खांदारे, तसेच मोहन आर्डेकर, सुनील पांगम, बापू पांगम, दिपक पांगम व अन्य भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रवेशामुळे नाटळ परिसरात भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

error: Content is protected !!