कणकवली (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कै. महादेव भा. ठाकूर स्मरणार्थ श्रीम. विजयालक्ष्मी ठाकूर,आचरा पुरस्कृत १० ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मालवण तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा शनिवार दि. १७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ठीक २.३० वाजता केंद्र शाळा आचरे नं. १ च्या सभागृहात आयोजित केली होती.
सदर स्पर्धेतील विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे –
प्रथम क्रमांक – दिव्या नितीन गावकर – आचरा
द्वितीय क्रमांक – नंदिनी परेश बाईत – रामगड
तृतीय क्रमांक – नुर्वी गिरीश शेटगे – आचरा
उत्तेजनार्थ १- उर्वी विनोद आचरेकर – आचरा
उत्तेजनार्थ २- श्रीश परेश तारी – आचरा
उत्तेजनार्थ ३- धम्मतेजा पल्लव कदम – आडवली
या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना संस्थेने पुस्तके व कार्यकारी सदस्य जयप्रकाश परुळेकर यांनी रोखरकमेच्या स्वरूपात बक्षिसे दिली. स्पर्धेचे परीक्षण अनघा कदम (शिक्षिका, न्यू इंग्लिश स्कूल, आचरा) व संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे यांनी केले. सदर स्पर्धेस संस्थेच्या नियमानुसार १२ विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. स्पर्धेस शिक्षक, पालक, विद्यार्थी, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य, सांस्कृतिक समिती सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल विनिता कांबळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री व स्वप्नील चव्हाण यांनी सहकार्य केले.












