21 जानेवारीला दाखल करणार उमेदवारी अर्ज
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील वरवडे पंचायत समिती सदस्य पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून राजेश उर्फ सोनू सावंत यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. २१ जानेवारी रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या संदर्भातील भाजपचा एबी फॉर्म तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी मिलिंद मेस्त्री, महेश गुरव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












