पूर्व माध्य.मध्ये कर्तव्य बांदिवडेकर तर पूर्व उच्च प्राथ.मध्ये आराध्य आपटे, पियुष लाड प्रथम

परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शिष्यवृत्ती सराव परीक्षा निकाल जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळामार्फत 11 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी गुरूवारी जाहीर करण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत पूर्व माध्यमिक (आठवी) मध्ये राणी पार्वतीदेवी हायस्कूल सावंतवाडीचा कर्तव्य तेजस बांदिवडेकर 254 गुण मिळवून प्रथम तर पूर्व उच्च प्राथमिक (5वी) मध्ये सावंतवाडी नं. 2 चा आराध्य अमोल आपटे आणि नेरूर-शिरसोस शाळेचा पियुष विजय लाड हे 276 गुण मिळवून प्रथम आले आहेत.

पूर्व माध्यमिकमध्ये आयडीयल इंग्लिश मिडियम स्कूल वरवडेचा गौरेश श्रेयस तायशेटे (274) द्वितीय व विद्यामंदिर हायस्कूल कणकवलीचा अन्वय अच्युत देसाई (230) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. पूर्व उच्च प्राथमिक (5वी) मध्ये आरोंदा नं. 1 शाळेची वृंदा विलास आवडण (270) द्वितीय व विद्यामंदिर हायस्कूल कणकवलीचा पार्थ पंडित तेली (268) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या 40 गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ लवकरच परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवली येथे संपन्न होणार असून संबंधित विद्यार्थ्यांना तारीख व वेळ कळविली जाईल. ही जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा एस.एम. हायस्कूल कणकवली व कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी या दोन केंद्रांवर मराठी आणि इंग्रजी माध्यमातून घेण्यात आली. केवळ दोनच केंद्रात 8 वी 275 व 5वी 577 विद्यार्थी सहभागी झाले होते.

या परीक्षेचा पूर्ण निकाल परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवली व कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी या ठिकाणी उपलब्ध असून वॉटस्‌‍ॲपच्या माध्यमातूनही उपलब्ध होईल. निकालासंदर्भात शैक्षणिक मंडळ अध्यक्ष गजानन उपरकर (9561347525), व्यवस्थापक विजय केळुसकर, परीक्षा प्रमुख सदानंद गांवकर, रावजी परब, सावंतवाडी (9423300144), सिध्देश कुलकर्णी (कळसुलकर हायस्कूल) यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे.
परीक्षा कामकाज यशस्वीतेसाठी गजानन उपरकर, संस्थान व्यवस्थापक विजय केळूसकर, सदानंद गावकर, शरद हिंदळेकर, प्रकाश परब, काशिनाथ कसालकर, रावजी परब, सुहास आरोलकर, विष्णू सुतार, श्रीकृष्ण कांबळी, मंगेश तेली, किरण कोरगावकर या शैक्षाणिक मंडळ सदस्यांसह सिध्देश कुलकर्णी, मुकेश पवार, अच्युत देसाई, वळंजू सर, राखी मुंज-पारकर, मनोज पिळणकर, निलेश पारकर, सुहास मुसळे यांसह मुख्याध्यापक एस. एम. हायस्कूल, कळसुलकर हायस्कूल, काणकवली शाळा नं 3, प्राचार्य डी. एड. कॉलेज कणकवली व छात्रशिक्षक, एस. एम. हायस्कूल व कळसुलकर हायस्कूलचे संस्था पदाधिकारी, परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत, खजिनदार दादा नार्वेकर, सचिव निवृत्ती धडाम, सर्व विश्वस्त, शैक्षणिक मंडळ सदस्य यांनी अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुणवत्ता यादी 1 ते 12 गुणानुक्रमे पुढील प्रमाणे-पूर्व माध्यमिक (आठवी)- कर्तव्य तेजस बांदिवडेकर (राणी पार्वतीदेवी हायस्कूल सावंतवाडी)-254, गौरेश श्रेयस तायशेटे (आयडीयल इंग्लिश स्कूल वरवडे)-234, अन्वय अच्युत देसाई (विद्यामंदिर हाय.कणकवली)-230, पार्थ जयंत वझे (कुडाळ हायस्कूल)-230, विश्वराज विजयसिंह सातपुते (एस.एम.कणकवली)-226, मैथिली संतोष पवार (कुडाळ हाय.)-226, दुर्वांक किशोर वालावलकर (कळसुलकर हाय.सावंतवाडी)-226, राजदीप उदय बांदेलकर (कळसुलकर हाय.सावंतवाडी) -216, निहिरा नंदू सावंत (सेंट उर्सुला वरवडे) -214, हर्ष राजेश शिवापूरकर (एस.एम.)-210, रिया धनंजय परब (कुडाळ हाय.)210, आर्ची अजित भोगले (वर्दम हाय.पोईप) -208, अर्णव जयवंत रावण (एस.एम)-208, वेधक विनय खोचरे (विद्यानिकेतन कसाल)-206, संस्कृती अशोक गावडे (शिवाजी स्कूल पणदूर)-200, वरदा वासुदेव सामंत (देसाई विद्यामंदिर परूळे)-200, आदर्श दीपक जाधव (कासार्डे हाय.)-198, निधी महेश धुरी (कुडाळ हायस्कूल)-198, शौर्य धोंडी पालवे (कुडाळ हाय.)-298), ओवी अरूण भिसे (कळसुलकर हाय.सावंतवाडी)-196.

गुणानुक्रमे 1 ते 11 क्र. -पूर्व उच्च माध्यमिक (पाचवी)-आराध्य अमोल आपटे (सावंतवाडी नं.2) 276, पियुष विजय लाड (शाळा नेरूर-शिरसोस)-276, वृंदा विलास आवडण (जि.प.शाळा आरोंदा नं.1)-270, पार्थ पंडित तेली (विद्यामंदिर कणकवली)-268, उर्वी दत्तात्रय आठलेकर (सावंतवाडी नं.4) 264, नील पांडुरंग थोरात (सावंतवाडी नं.2)-258, चैतन्य मनोज गवाणकर (लोरे नं.1)-254, सई शिवाजी आरेकर (सावंतवाडी नं.2)-254, मीरा महादेव सामंत (एस.एल.देसाई पाट)-254, गार्गी भालचंद्र आजगावकर (कुडाळ कुंभारवाडा)-248, पूर्वांग कुणाल माळगावकर (सावंतवाडी नं.2)-248, प्रणय प्रशांत परब (वजराट नं.1) -244, राजनंदिनी चंद्रशेखर सावंत (सावंतवाडी नं.4)-244, प्राजक्ता रामचंद्र श्रुंगारे (नेरूर-शिरसोस)-244, अनुप्रिया अजित राणे (सावंतवाडी नं.4)-242, राघव भरत राऊळ (माडखोल-मेटवाडी)-242, स्वानंदी शरद राऊळ (माडखोल मेटवाडी)-242, यश संजय परब (वजराट नं.1)-240, ऋत्वा पांडुरंग पाटील (तळवणे नं.4)-240, आयुष उमेश भाई (कुडाळ-कुंभारवाडा)-238.

error: Content is protected !!