पाऊले चालती पंढरीची वाट

श्री गांगोमाऊली वारकरी संप्रदायाच्या पायी वारीचे पंढरपूरकडे प्रस्थान !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे गांगोमाऊली वारकरी संप्रदायाच्या कोकण पायी वारीचे पंढरपूरच्या दिशेने ग्रामदैवत श्री देव गांगोच्या मंदिरातून प्रस्थान ठेवण्यात आले. चालू वर्षी पंढरीचा सुबक परंतु नाजूक कलाकुसरीने बनविलेला लाकडी रथ आणि त्यात श्री विठूमाऊली ची प्रसन्न, सर्वांगसुंदर प्रतिमा ! हे या पायी वारीचे आकर्षण ! आणि त्यामुळे वारकऱ्यांचा उत्साह पावलो गणिक वाढत होता एक अदृश्य ऊर्जा– पांढराशुभ्र वेश परिधान– वारकरी महिला- पुरुषांमध्ये सळसळत होती. श्रीमाऊलीच्या मंदिराला वळसा घालून, बाजारपेठेतील श्री देव राधाकृष्ण मंदिरामध्ये वारकऱ्यांनी आरती केली. त्यानंतर बाजारपेठेतून विठू नामाचा गजर करत,विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये थोडा वेळ विश्रांती घेऊन, वारकऱ्यांची ” पाऊले चालती पंढरीची, वाट — मुखात संतांचे अभंग टाळ, विणा,मृदंगाच्या साथीने विठू माऊलीचा जयघोष ! यामुळे फोंडाघाट बाजारपेठ दुमदुमून गेली …

दरवर्षी विठ्ठलाच्या ओढीने, कोकणातील भाविक- वारकरी मिळेल त्या वाहनाने, खास एसटी करून अथवा विविध ठिकाणच्या पायी वारीच्या मंडळात सहभागी होत, माघी एकादशीला पंढरपूरला पोहोचतात. “एक वारी अनुभवावी” या संत महातांच्या उपदेशाप्रमाणे, कोकणातील भावीक पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात.

error: Content is protected !!