महीला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने पुरुष सन्मान पुरस्काराचे वितरण

कणकवली तालूक्यात ऋषिकेश मोरजकर प्रथम

जिल्हा पुरस्कार साठी कणकवली मधून तिघांची निवड

कणकवली (प्रतिनिधी): महीला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने पुरुष सन्मान पुरस्काराचे वितरण नुकतेच आज कणकवली पंचायत समितीच्या प.पू.भालचंद्र सभागृह येथे संपन्न झाले आहे. या पुरस्कारामध्ये कणकवली तालूक्यात नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांना निवड समितीने प्रथम क्रमांक जाहिर केला आहे. पुढील जिल्हा पुरस्कार साठी कणकवली मधून तिघांची निवड करण्यात आली असून यामध्ये अनुक्रमे आलेल्या ऋषिकेश मोरजकर, सुर्यकांत ढवण , शैलेश तळेकर यांची निवड करण्यात आली आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग महिला व बाल विभाग महाराष्ट्र शासन अधिकृत नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प व्दारा हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र कणकवली जेंडर व न्युट्रीशियन घटकांतर्गत तालुका स्तरीय पुरुष सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच कणकवली पंचायत समिती प.पू.भालचंद्र सभागृह येथे संपन्न झाला आहे. तालुका कृषी अधिकारी पवार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमास सुरुवात झाली. सदर कार्यक्रमास जिल्हा आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी श्री नितीन काळे ,पंचायत समिती कणकवलीचे कृषी अधिकारी श्री पवार ,एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या मुख्य सेविका हळदणेकर ,श्रीमती नाईक, लोकसंचालित साधन केंद्राचे अध्यक्ष उदय मती देसाई, सचिव शितल मांजरेकर ,संचालक मंडळ उपस्थित होते.या पुरस्कार निवड प्रक्रियेत तहसिलदार , गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका पोलिस निरीक्षक यांच्या निवड समितीने वरील पुरस्कारासाठी निवड केली असून या 28 मधून तालूक्यात प्रथम येण्याचा सन्मान नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांना मिळाला आहे .महीलांना सक्षम करण्यासाठी पुरुष मंडळी यांना गावपातळीवरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.कणकवली तालुक्यातील ज्या 28 गावांमधून तर जिल्ह्यातील साधारण 120 गावातील पुरुष मंडळी यामधे असणार आहेत. महीला आर्थिक विकास महामंडळाचे काम काज सुरू आहे या गावातील समाजातील सर्व स्तरांतील काम करणारे पुरुष मंडळी निवडण्यात आली आहे .कणकवली तालुक्यातील या 28 पुरुष सन्मान पुरस्कार मधून कणकवली तालुक्यातील 3 पुरुष मंडळी यांना जिल्हा पुरुष पुरस्कार साठी निवडण्यात आले असून साधारण जिल्ह्यातील 15 पुरुष मंडळी यामधे असणार आहे . यामध्ये सी.एम.आर.सी. कार्यक्रम कार्यरत 28 गावातील सुधारक पुरुष यांना सन्मानित चिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे 28 गावातील निवड प्रक्रियेत प्रथम क्रमांक ऋषिकेश किशोर मोरजकर – नांदगाव, द्वितीय क्रमांक सूर्यकांत सखाराम ढवण करुळ व तृतीय क्रमांक शैलेश कृष्णा तळेकर कुर्ली वसाहत यांना देण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक सीमा गावडे व आभार प्रदर्शन हिरकणी सहयोगणी भारती नारिंग्रेकर यांनी केले. जिल्हास्तरीय निवड प्रक्रियेमध्ये जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यातील पुरस्कार निवड प्रक्रिया झाल्यानंतर 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण ओरस येथे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याचे महिला आर्थिक विकास महामंडळाचे नितीन काळे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!