बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे आयोजन
मसुरे (प्रतिनिधी): बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे सुट्टीची मजा शिबीराच्या दुसऱ्या दिवशी बाळकृष्ण नांदोसकर या शिक्षकांनी सुंदर हस्ताक्षर या विषयी मुलांना मार्गदर्शन केले.सुंदर हस्ताक्षर ही शिक्षणाची महत्वाची पायरी असून त्यातील बारकावे नीट लक्षात घेतल्यास आपले हस्ताक्षर सुंदर होते हे गुरुजीनी प्रात्यक्षिकासह मुलाना समजावून सांगितले.मुलांचा उस्फूर्त सहभाग लाभला. बापू तळावडेकर, रमेश म्हाडगुत, दीपक भोगटे, नम्रता पावसकर, वीणा म्हाडगुत, अॅड समृद्धी म्हाडगुत,डगरे मॅडम, प्रियांका भोगटे, शंकरदास मॅडम, हडकर मॅडम, माळवदे मॅडम आदी उपस्थित होते.













