सिंधुदुर्ग वैश्य समाज पतसंस्थेच्या देवगड शाखा कार्यालयाचे नूतन जागेत स्थलांतर

कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेची देवगड शाखा 1999 मध्ये सुरू करण्यात आली. गेल्या काही वर्षात सिंधुदुर्गात पतसंस्थेने सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. संस्थेच्या प्रगतीचा आलेख नेहमीच चढता राहिला आहे.येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात या पतसंस्थेच्या शाखा होतील असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेच्या देवगड शाखेच्या सौरभ कॉम्प्लेक्स, पहिला मजला कॉलेज रोड देवगड येथील नूतन कार्यालय स्थलांतर सोहळ्यात प्रसाद पारकर यांनी मार्गदर्शन केले. नवीन कार्यालयाचे उद्घाटन सहकारी संस्था देवगडचे सहाय्यक निबंध अनिल राहींज व जिल्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांच्या हस्ते करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दिलीप पारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यास देवगड जामसंडे नगरपंचायतच्या नगराध्यक्ष साक्षी प्रभू, सिंधुदुर्ग बँकेचे संचालक ऍड. प्रकाश बोडस, वैश्य समाज देवगड तालुका अध्यक्ष बिपिन कोरगावकर, देवगड तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शैलेश कदम ,देवगडचे उद्योजक संदेश शिरसाट आदी उपस्थित होते. संस्थेचे सभासद, ठेविदार, हितचिंतक व जुन्या – नव्या शाखा कार्यालयाच्या जागेचे मालक अशा सुमारे 65 मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.वैश्य समाज सहकारी पतसंस्थेची आर्थिक वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे.येत्या काळात संस्थेची वाटचाल अशीच सुरू राहील असे सहाय्यक निबंधक अनिल राहींज यांनी सांगितले. संस्थेला झालेला नफा पाहता चांगले कामकाज सुरू असून आर्थिक व्यवहार आहे चांगले आहेत अशा शब्दात ऍड. प्रकाश बोडस यांनी गौरव केला. सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था ही समाजातील सर्व घटकांसाठी कार्यरत आहेत. ही संस्था सर्व समाजांसाठी आर्थिक व्यवहार करत असून सभासद व नागरिकांनी अधिकाधिक ठेवी संस्थेकडे ठेवाव्यात. त्याचबरोबर ज्यांना गरज आहे अशांनी कर्जासाठी जरूर मागणी करावी. लवकरच संस्थेच्या बांदा, कट्टा व खारेपाटण येथे शाखा सुरू केल्या जाणार आहेत, असे चेअरमन दिलीप पारकर यांनी सांगितले. सूत्रसंचालन काका सावंत, प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर तर आभार संचालक संजय पेडणेकर यांनी मांडले कार्यक्रमास संस्थेचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!