समीर हडकर यांचा ‘उबाठा शिवसेना ‘ सदस्यत्व पदाचा राजिनामा….!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर येथील उद्योजक समीर चंद्रकांत हडकर यांनी शिवसेना ‘उबाठा’ प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा कुडाळ मालवण विधानसभा माजी आमदार तथा शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांच्या जवळ सुपूर्द केला आहे.

समीर हडकर आपल्या राजीनामा पत्रात म्हणतात, मी शिवसेना पक्षामध्ये गेली दहा वर्षे राजकारण आणि समाजकारण करत होतो आणि त्याद्वारे लोकांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. परंतु बदललेल्या राजकारणामुळे शिवसेना पक्षामध्ये सुद्धा गटातटाचे आणि सोईचे राजकारण सुरू झाले. त्याचीच परिणीती स्थानिक पातळीवर झाली. त्याकडे आपण हेतूपुरस्कर दुर्लक्ष केले. आपण निर्माण केलेल्या गटातटाच्या राजकारणामुळे मी शिवसेना पक्षाचा प्राथमिक सदस्याचा राजीनामा आपल्याकडे देत आहे. भविष्यात आपल्या पक्षाला उभारी मिळावी आणि आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

समीर हडकर यांच्या राजीनामा अस्त्राने मालवण तालुक्याच्या राजकारणार खळबळ माजली असून जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका चालू असताना समीर हडकर यांची आगामी राजकीय वाटचाल पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

error: Content is protected !!