महावितरणच्याविरोधात धीरज मेस्त्रींचे उपोषण

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ-सुतारवाडीतील पिंपळपार परिसरात उभारलेल्या सभामंडळावरून महावितरणची उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली आहे. या वाहिनाचा स्पर्श होऊन याठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. महावितरणच्या असंवेदशीलपणाच्या निषेधार्थ कलमठ ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री यांनी उपोषण सुरू केले आहे. महावितरणचे अधिकारी, प्रांताधिकारी यांचे ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी लक्ष वेधले होते. मात्र, विद्युत वाहिनीच्या सुरक्षितेच्यादृष्टीने महावितरणने कोणताही उपाययोजना केल्या नाहीत. महावितरणच्या असंवेदशीलपणाच्या निषेधार्थ धीरज मेस्त्री यांनी उपोषण सुरू केले आहे.

कलमठ सुतारवाडी पिंपळपार येथील सभामंडपावरून जाणाऱ्या धोकादायक उच्चदाब विद्युतभरीत वाहिन्यांमुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. याबाबत महावितरणकडे वारंवार निवेदन, पत्रव्यवहार, स्थळ पाहणी व कायदेशीर नोटीस देऊनही महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उपाययोजना करण्याकडे अक्ष्यम दुर्लक्ष केले आहे. महावितरण नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. तसेच ठेकेदार विकासाच्याविरोधात मेस्त्री हे उपोषणाला बसले आहेत. मेस्त्री यांच्या उपोषणाला स्थानिकांनी पाठिंबा दिला आहे.

error: Content is protected !!