खारेपाटण पंचशील नगर येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उस्ताहात साजरा

कु. सुप्रबुद्ध पाटणकर या शालेय विद्यार्थ्याचा विशेष सत्कार

तर दिनेश पाटणकर यांनी “भारतीय संविधान” व “बुद्ध आणि धम्म” ग्रंथ दिले भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने ७७ वा भारतीय प्रजासतक दिन पंचशील नगर,खारेपाटण येथे आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक व संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा संकिता संतोष पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उस्ताहात साजरा करण्यात आला. प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा संकिता पाटणकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून व भारतीय ध्वज फडकवून प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाला पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे माजी अध्यक्ष व पत्रकार संतोष पाटणकर,बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे सचिव सागर पोमेडकर,संघटनेचे बौद्धचार्य संतोष मधुकर पाटणकर,ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटणकर, अशोक पाटणकर, मुंबई मंडळाचे खजिनदार दिनेश पाटणकर, सामाजिक कार्यकर्ते बबन शिंगे, अंगणवाडी सेविका सविता पाटणकर,पंचशील विकास मंडळाचे कार्यकर्ते धीरज जुमलेकर,अमित पाटणकर,संदीप पाटणकर, मकरंद पाटणकर,संघमित्रा महिला मंडळ उपाध्यक्ष सायली तुरळकर, सचिव -आस्था पाटणकर, खजिनदार – दीक्षा पाटणकर, अश्विनी पाटणकर,आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहारात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय नवोदय स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून सांगेली, सावंतवाडी येथे जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या पंचशील नगरातील रहिवासी असलेला व खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ येथे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी कु.सुप्रबुद्ध संदेश पाटणकर याचा मंडळाच्या वतीने पुषगुच्छ व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला.व त्याच्या पुढील शैशणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तर, मुंबई मंडळाचे कार्यकर्ते दिनेश पाटणकर यांनी प्रजासतक दिनानिमित्त “भारतीय संविधान ” व “बुद्ध आणि त्याचा धम्म” हे दोन ग्रंथ भेट म्हणून मंडळाकडे सुपूर्द केले. यावेळी त्यांचे मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करून त्यांचा देखील मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष पाटणकर यांनी केले.

error: Content is protected !!