संतोष कानडेंचे बंड झाले थंड ; अपक्ष उमेदवारी मागे घेणार
कणकवली (प्रतिनिधी) : भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी झेड पी उमेदवारी डावलल्यानंतर केलेली बंडखोरी आता शमली असून कानडे यांनी आपल्या व्हाटसप स्टेट्सला काल आज उद्याही नितेश साहेबांसोबत अशा आशयाचे स्टेटस ठेवले आहे. कानडे यांच्या व्हाटसप स्टेटसमध्ये खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबतचे फोटो असून दाखवाल ती दिशा..सांगाल तो मार्ग..द्याल ती जबाबदारी..शब्द ही भावना होती. निष्ठा ही श्रद्धा आहे. काल आज उद्याही नितेश साहेबांसोबत असा मजकूर आहे. कासार्डे मतदारसंघातून झेड पी उमेदवारी दिली नाही म्हणून संतोष कानडे यांनी स्वतःच्या व्हाटसप स्टेटस ला नीतेश राणेंना रामराम आणि गोट्या सावंतांना सलाम असे स्टेटस ठेवुन उघड विरोधी भूमिका घेतली होती. फोंडाघाट आणि हरकुळ जि. प. मतदारसंघात कानडे यांनी अपक्ष उमेदवारी देखील दाखल केली होती. यव दोन्ही अपक्ष उमेदवार देखील ते मागे घेणार असल्याचे समजते.











