काळसे हायस्कुल येथे ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री शिवाजी वाचन मंदिरचे आयोजन

चौके (प्रतिनिधी) : श्री शिवाजी वाचन मंदिर काळसे च्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सोमवार दिनांक २६ जानेवारी रोजी काळसे हायस्कूल येथे ग्रंथप्रदर्शन आयोजित केले होते.
या प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान या ग्रंथप्रदर्शनाचे उद्‌घाटन मालवण सहाय्यक गट विकास अधिकारी पाडूरंग सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी नेहा माईणकर मॅडम, मुख्याध्यापक अविनाश परब वाचनालय संचालक योगेश राउळ, पोलीस पाटील विनायक प्रभु, शिक्षण संस्था सेकेटरी अनंत परब, माजी संचालक राजेंद्र परब, ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण माडये, कांबळे सर, चव्हाण सर, मेस्त्री मॅडम, संदिप धामापूरकर, भाऊ घाडी, ग्रंथपाल चारुलता काळसेकर, शिवनंदन प्रभु, हरेष आंग्रे, आदी उपस्थित होते. यावेळी पांडुरंग सावंत यांनी उपक्रमाचे कौतुक करून ग्रंथप्रदर्शन हे जास्तीत जास्त नवीन वाचकांपर्यंत पोहचण्याचा योग्य मार्ग आहे असे सांगून मुलांना वाचनाची आवड निर्माण करण्याचे आवाहन केले.

error: Content is protected !!