खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद मतदार संघातील खारेपाटण व तळेरे या दोन्ही पंचायत समितीच्या उमदेवाराच्या प्रचारासाठी खारेपाटण येथे आज रविवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या महायुतीच्या सभेत शिवसेना उभाठा पक्षाचे शाखा प्रमुख भूषण शेलार व वैभव कांबळे यांसह साळीस्ते व शेर्पे येथील सुमारे २७ कार्यकर्त्यांनी आज पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थिती भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.या सर्व कार्यकत्यांचे मंत्री नितेश राणे यांनी भाजप पक्षात स्वागत करून सर्व कार्यकर्त्यांचा भाजप पक्षात सन्मान केला जाईल असे सांगितले.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर,शिवसेना शिंदे पक्षाचे तालुका प्रमुख मंगेश गुरव,माजी जि.प.सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार,श्रीमती रत्नप्रभा वळंजू,माजी पं.स.सदस्य सौ तृप्ती माळवदे,भाजप शक्ती केंद्र प्रमुख श्री सूर्यकांत भालेकर,भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रमाकांत राऊत, खारेपाटण सरपंच व खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघाच्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवार सौ प्राची ईसवलकर, खारेपाटण पं.स.उमेदवार गुरुप्रसाद शिंदे,तळेरे पं स.उमेदवार राजेश जाधव आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण येथे आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थित भाजप पक्षामध्ये प्रवेश केलेले कार्यकर्ते पुढील प्रमाणे —
भूषण शेलार शेर्पे ग्रामपंचात सदस्य व शिवसेना उबाठा शाखा प्रमुख,श्री वैभव कांबळे शिवसेना उभाठा शाखा प्रमुख साळीस्ते,अरुण कांबळे,हृतिकेश कांबळे, चेतन कांबळे सर्व राहणार साळीस्ते यांसह शेर्पे येथील नामदेव कदम,शोभा कदम,सुनंदा तेली,वासुदेव पवार,सुनंदा पांचाळ,नारायण पांचाळ,निर्मला पांचाळ,सुलोचना पांचाळ,दीपक पांचाळ,सचिन पांचाळ,कल्पना पांचाळ,वैशाली पांचाळ, सुगंधा पवार,पांडुरंग पांचाळ,सविता पवार, वामन तेली,जयश्री तेली,मोरेश्वर पवार,वसंत पांचाळ,ज्ञानदेव पांचाळ, महेश पवार,तुकाराम तेली,आदी पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी आज भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.












