वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयातील शिक्षकाने विद्यालयातील मुलींशी गैरवर्तन करून गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकावर पोक्सो कायद्यान्वये वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित आरोपी शिक्षक विद्यार्थिनींना शिकवण्याच्या बहाण्याने जवळ घेऊन त्यांच्याशी बॅड टच करत असल्याचा आरोप आहे. हा गैरप्रकार जुलै २०२५ पासून सुरू होता. अखेर यातील एका विद्यार्थिनीने धाडस करत या प्रकाराची माहिती आपल्या पालकांना दिली. त्यानंतर संबंधित विद्यार्थिनीने रविवारी वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा संबंधित शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपीला रविवारी न्यायालयात हजर












