वैभववाडीत ठाकरे शिवसेनेला आणखी एक धक्का; शिवसेच्या अपक्ष उमेदवाराचा भाजपाला पाठिंबा

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात ठाकरे शिवसेनेला धक्यावर धक्के बसत असून आणखी एक धक्का बसला आहे. भुईबावडा पंचायत समितीतील ठाकरे शिवसेचे अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवानंद पालांडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

भुईबावडा पंचायत समितीत भाजपाकडून देवानंद पालांडे, तर उबाठा सेनेकडून जितेंद्र तळेकर तर उबाठा सेनेचे वसंत मोरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र जितेंद्र तळेकर यांनी कोळपे जि. प. मतदार संघातील उबाठा सेनेचे अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. या मतदार संघातील उबाठाचे अधिकृत उमेदवार सुनील यांचा अर्ज छानणीत बाद झाला होता. त्यामुळे याठिकाणी उबाठा सेनेची मदार ही त्यांचे अपक्ष उमेदवार असलेले जितेंद्र तळेकर यांच्यावर होती. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर भुईबावडा पंचायत समितीत उबाठा सेना जितेंद्र तळेकर यांचा प्रचार करणार की त्यांचे अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांचा प्रचार करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान उबाठा सेनेने जितेंद्र तळेकर यांचा प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे नाराज झालेले वसंत मोरे यांनी सोमवारी सकाळी भाजपाच्या देवानंद पालांडे यांना जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे उबाठा सेनेला आणखी एक धक्का बसला आहे.

सुरुवातीला कोकीसरे पंचायत समिती मतदारसंघासाठी उबाठा सेना उमेदवार देऊ शकले नाही. त्यामुळे त्याठिकाणी भाजपच्या साधना नकाशे बिनविरोध झाल्या आहेत.

श्री. मोरे यांनी सोमवारी रीतसर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देवानंद पालांडे यांना पाठींबा दिला आहे. यावेळी भाजपाचे नासीर काझी, भालचंद्र साठे, किशोर कांबळे, स्वप्नील खानविलकर, अभय कांबळे, मनोज परब, रविंद्र गुरव, विलास कदम, प्रताप पालांडे, पांडुरंग जाधव, धनाजी हडशी, प्रथमेश पालांडे, ओंकार पाटील, प्रसाद पालांडे, प्रथमेश देसाई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलतांना श्री. मोरे म्हणाले, मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र मला पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली नाही. मी ३५ वर्षे पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले होते. मात्र पक्षाकडून माझा विश्वासघात करण्यात आला. त्यामुळे मी पालकमंत्री नितेश राणेंचे नेतृत्व मानून भाजपाला पाठींबा देत असल्याचे सांगितले. या घडामोडींमुळे या मतदारसंघात भाजपाची बाजू अधिक भक्कम झाली आहे.

ठाकरे शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी भाजपच्या उमेदवार देवानंद पालांडे यांना पाठिंबा दिला. त्याचे पत्र भाजपचे नासीर काझी यांच्याकडे सुपूर्द केले.

error: Content is protected !!