वागदेत प्राची आमडोसकर, चंदना सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ
कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उबाठाच्या कळसुली जिल्हापरिषदच्या उमेदवार प्राची आमडोसकर आणि ओसरगाव पं स च्या उमेदवार चंदना सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ वागदे उभादेव येथे करण्यात आला. माजी आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राची आणि चंदना यांच्या प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. यावेळी रुपेश आमडोसकर, ओसरगाव माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.














