अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आरोपीला सशर्त जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीला फोनद्वारे संपर्क साधून रात्री घराबाहेर दुसऱ्या ठिकाणी बोलावून तीच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ओंकार लक्ष्मण कोकरे याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश तथा विशेष न्यायाधिश व्ही.एस.देशमुख यांनी ५० हजार रुपयांच्या जाचमुचलक्याच्या सशर्थ जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.

नुकत्याच झालेल्या जुजबी ओळखीतून रात्री ८.३० ते ११ वा.च्या मुदतीत पडित अल्पवयीन मुलीला फोनद्वारे संपर्क साधून तुझ्याशी फ्रेंडशिप करायची आहे, असे सांगून घराबाहेर बोलावले. त्यानंतर तीच्याशी गैरवर्तन करत मनाज लज्जा उत्पन्न होईल वर्तन करत तीला बाईकवर बसवून स्वतःच्या घरी पळवून नेले. याबाबत दाखल फिर्यादीनुसार भा.न्या.सं. कलम १३७ (२), ७४, ७५, ७६ व ३५१ (२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपीच्यावतीने दाखल जामिन अर्जावर सुनावणीअंती पुन्हा असा गुन्हा करू नये, साक्षीदारावर दबाव आणू नये अशा अटीवर सशर्थ जामिन मंजूर करण्यात आला आहे.

error: Content is protected !!