जिल्ह्यात महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून येणार – आमदार नीलेश राणे
महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचायत समितीचे भाजप शिवसेना महायुतीचे शिवसेना शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार गुरुप्रसाद शिंदे यांच्या प्रचारार्थ आज गुरुवार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे शिवसेना पक्षाचे आमदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत खारेपाटण बाजारपेठ येथे भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.यावेळी या प्रचार रॅलीत खारेपाटण विभागातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.यावेळी रॅलीला संबोधित करताना आमदार नीलेश राणे यांनी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.
खारेपाटण येथील श्री देव रवळनाथ मंदीर येथे देवळा नारळ अर्पण करून व आशीर्वाद घेऊन महायुतीच्या प्रचार रॅलीची सुरुवात करण्यात आली.व खारेपाटण एस टी बस स्थानक मार्गे खारेपाटण बाजारपेठ मधून थेट घोडेपाथर बंदर पर्यंत या भव्य रॅलीचा समारोप करण्यात आला.आमदार नीलेश राणे यांसह शिवसेना उपनेते संजय आंग्रे शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरद वायंगणकर भाजप कणकवली तालुका प्रमुख दिलीप तळेकर,माजी अध्यक्ष संतोष कानडे माजी जि.प.सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार,भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामकांत राऊत,खारेपाटण सरपंच व खारेपाटण जि.प.बिनविरोध निवडून आलेल्या भाजप सदस्य प्राची ईसवलकर, खारेपाटण पंचायत समितीचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे,तळेरे पंचायत समितीचे उमेदवार राजेश जाधव भाजप महिला कार्यकर्त्या बेबी तळेकर,निशा गुरव,आरती गाठे,भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामकांत राऊत,भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर, कुरंगावणे बेर्ले सरापंच पप्पू ब्रम्हदंडे,शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ,शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये,खारेपाटण उपसरपंच मंगेश गुरव,साळीस्ते उपसरपंच ,गुरव चिंचवली सरपंच अशोक.पाटील,वायंगणी सरपंच अस्मि लाड,भाजप महिला कार्यकर्त्या आरती गाठे,सौ आशा गुरव, शिवसेना शिंदे पक्षाचे कार्यकर्ते मंगेश ब्रम्हदंडे,सुहास राऊत, गौरी शिंदे,चंदू शिंदे,रुपेश सावंत,भाजप कार्यकर्ते किशोर माळवदे,मयुरेश लिंगायत,किशोर माळवदे,अमित मांजरेकर,इस्माईल मुकादम,योगेश पाटणकर,शेखर कांबळे,शेखर कांबळी,विजय सावंत,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार नीलेश राणे म्हणाले खारेपाटण पंचायत समितीचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असून त्यांनाच आपल्याला भरघोस मताने निवडून आणायचे आहे.राणे ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी शंभर टक्के बरोबर असतात कधीच एक टक्का देखील भेसळ करत नसतात.असा उपरोधिक टोला देखील निलेश राणे अपक्ष उमेदवारा बाबत लगावला. तसेच खारेपाटण मधून जास्तीत जास्त मताधिक्याने महायुतीचा उमेदवार निवडून आणा अपक्ष कोणतरी उमेदवार उभा आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करा.शिवसेना उभाठा पक्षाचे उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करा आणि गुरुप्रसाद शिंदे यांना बहुमताने विजयी करा.देशात, राज्यात आणि जिल्ह्यात आपलीच सत्ता आहे.आता खारेपाटण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये सुद्धा आमचेच महायुतीचे उमेदवार निवडून येणार असल्याने राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या भागाचा विकास करणार असल्याचे यावेळी आमदार नीलेश राणे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान खारेपाटण येथे महायुतीच्या प्रचार रॅली निमित्त आलेल्या आमदार नीलेश राणे यांचा खारेपाटण माजी सरपंच व महायुतीचे प्रचार प्रमुख रामकांत राऊत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच खारेपाटण सरपंच व खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघामधून बिनविरोध निवडून आलेल्या महायुतीच्या भाजप पक्षाच्या उमेदवार प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खारेपाटण येथे प्रचार रॅलीत महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












