कणकवली (प्रतिनिधी) : श्री लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळ वरवडेच्या (परबवाडी) वतीने श्री लिंगेश्वर मंदिर वरवडे (लिंगाची भाटी) येथे रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री निमित्त 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 12 वाजण्याच्या दरम्यान अभिषेक केला जाईल. दुपारी 12:30 ते 1:30 वाजण्याच्या दरम्यान महाआरती व तीर्थ प्रसाद, दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसाद, दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान नदीपात्रात दीपार्पण सोहळा, सायंकाळी 7 वाजता सुस्वर भजने असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाशिवरात्री उत्सवाला सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळ वरवडेच्या वतीने महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन












