आजचा सत्कार हा जगत जननी श्रीदेवी आई भराडी मातेचा प्रसाद – दत्तप्रसाद पेडणेकर

आंगणेवाडी येथे पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांचा सत्कार

आचरा (प्रतिनिधी) : आंगणेवाडीच्या पुण्यभूमीतील आजचा हा सत्कार हा जगत जननी श्रीदेवी आई भराडी मातेचा प्रसादच आहे असं मी समजतो. आई भराडी मातेच्या कृपा आशीर्वादाने आज आम्हा सर्वांना खूप काही मिळाले आहे. तिच्यामुळेच आज माझ्या आयुष्यात सर्व काही मान सन्मान मिळाले आहेत. यापुढेही मातेची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला सर्वांना मिळू दे आणि आंगणे परिवाराचा प्रेम नेहमी असंच पाठीशी राहू दे. आज माझा जो मान सन्मान केलात याबद्दल आंगणेवाडी नाट्य मंडळ मुंबई, आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी आणि आंगणेवाडी ग्रामविकास मंडळ मुंबई या सर्वांचा मी ऋणी आहे, असे प्रतिपादन आंगणेवाडी येथे बोलताना पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी केले.

आंगणेवाडी नाट्य मंडळ मुंबई, आंगणे कुटुंबिय आंगणेवाडी आणि आंगणेवाडी ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या वतीने आंगणेवाडी येथे यात्रा उत्सवात चांगलं काम करणाऱ्या तसेच विशेष योगदान प्राप्त मान्यवरांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष सतीश उर्फ छोटू आंगणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

यावेळी पोलीस दलाची शान आणि आंगणेवाडी यात्रा उत्सवात विशेष कामगिरी करणारे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे म्हणाले, “आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांचे यात्रा उत्सवातील नियोजन हे सुयोग्य आणि भाविकांना लवकरात लवकर दर्शन देण्यासाठी उपयुक्त असते. खरोखरच त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तेवढेच थोडं आहे. प्रशासन आणि आंगणे कुटुंबीय यांच्या संयुक्त अशा नियोजनातून भराडी मातेचा हा उत्सव प्रतिवर्षी मोठ्या भक्ती पूर्ण वातावरणात साजरा होतो. आज जो या ठिकाणी माझा सत्कार झाला याबाबत मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि देवीच्या आशीर्वादाने यापुढे सुद्धा मी पोलीस दलामध्ये चांगली सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.”

यावेळी आंगणे कुटुंबांच्या वतीने ज्येष्ठ नाटककार नरेंद्र आंगणे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सांडव, युवा कार्यकर्ते देवेंद्र उर्फ आबा आंगणे, पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर, डॉक्टर विश्वास साठे, डॉक्टर पटवेकर यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष सतीश उर्फ छोटू आंगणे, उपाध्यक्ष आनंद आंगणे, सेक्रेटरी काका आंगणे, बाळा आंगणे, मधुकर आंगणे, प्रसाद आंगणे, गजानन आंगणे, समीर आंगणे, नंदू आंगणे, संकेत आंगणे, महेश पटेल, सचिन आंगणे, जयवंत आंगणे, तनुराज आंगणे, दिनेश आंगणे, बाबू आंगणे, कुणाल आंगणे, महेश आंगणे, गणेश आंगणे, आबा आंगणे, जयेश अंगणे, निशिकांत आंगणे, विलास आंगणे, प्रकाश आंगणे, भास्कर आंगणे, बाब्या आंगणे, पप्पू राणे, सुधा आंगणे, अक्षय आंगणे, चंद्रशेखर आंगणे, अमोल आंगणे, अनंत आंगणे, नितेश वंजारे, अंकुश कांबळी, तारक कांबळी, शैलेश आंगणे, पंकज आंगणे, विनोद आंगणे, बंटी अंगणे, सुयोग आंगणे, समीर आंगणे, रघुनाथ आंगणे, निशिकांत आंगणे, बाब्या आंगणे, राजू आंगणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार प्रास्ताविक गजानन उर्फ बाबू आंगणे यांनी केले.

error: Content is protected !!