श्री देव बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्री सोहळा उत्साहात

बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथील प्रसिद्ध व जागृत अशा स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत महाशिवरात्री रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी असून पूर्वसंध्येला शनिवारी रात्री पालखी सोहळ्याने या उत्सवाला प्रारंभ झाला. आज हजारो भाविकांनी श्री देव बांदेश्वर मंदिरा देऊन बांदेश्वर चे दर्शन घेतले .विविध कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत सकाळी सूर्योदयापासून उद्यापर्यंत स्वयंभू लिंगावर अष्टो प्रहार रूद्रावर्तन अभिषेक चालू आहे. तसेच सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत शिवलीलामृत ग्रंथ पारायण होत आहे

error: Content is protected !!