आचरा गावच्या शिल्पा गांवकर- डोंगरे हिची व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी महाराष्ट्र दिव्यांग महिला संघात निवड….!

आचरा (प्रतिनिधी) : उत्तरप्रदेश मेरठ येथे २५ ते २८ फेब्रुवारी रोजी संपन्न होणाऱ्या १४ व्या नॅशनल पॅरासिटींग व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी महाराष्ट्रच्या दिव्यांग महिला संघाची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे. या संघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा गावची सुकन्या शिल्पा गांवकर-डोंगरे हिची निवड करण्यात आली आहे.

व्हॉलीबॉल पॅरासिटींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने १४ व्या नॅशनल पॅरा सिटींग व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप दिव्यांग महिलांच्या महाराष्ट्र २०२६ च्या संघाची निवड चाचणी स्पर्धा नुकतीच नागपूर येथे पार पडली. ही निवड चाचणी स्पर्धा पॅरा सिटींग व्हॉलीबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नामदेवराव बालहार दादा, सेक्रेटरी राहुल लेकरूपाले, जॉईंट सेक्रेटरी गुरुदास राऊत, स्टेट एकलव्य सपोर्ट अवॉर्ड विजेते दिनेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

या पूर्वी नाशिक येथे पार पडलेल्या पहिल्या युनायटेड राष्ट्रीय मास्टर्स क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन शिल्पा गांवकर-डोंगरे हिने कांस्यपदक पटकाविले होते. या निवडु बद्दल शिल्पा गांवकर-डोंगरे हिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!