मुंबई विद्यापीठात आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचा पोवाडा स्पर्धेत दैदिप्यमान यश

आचरा (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत आयोजित “उडान महोत्सव – २०२६” अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन पोवाडा स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत दि आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई संचलित, आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आचरा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

सदर स्पर्धा कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा व साहित्य भवन, कलीना कॅम्पस, मुंबई विद्यापीठ, सांताक्रूझ येथे दिनांक 18/02/2026 रोजी उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथांवर आधारित पोवाड्याचे प्रभावी सादरीकरण करून परीक्षक व उपस्थितांची मने जिंकली. या यशामध्ये विद्यार्थ्यांची जिद्द, परिश्रम व संघभावना यांचा मोलाचा वाटा असून मार्गदर्शक प्राध्यापिका सौ. मुणगेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

या पोवाडा सादरीकरणात शाहीर मानसी मेस्त्री हिने प्रमुख भूमिका साकारली. तसेच कोरस गटात निकिता घाडीगावकर, अमिषा पेडणेकर, मानसी घाडीगावकर, सुरभी त्रिंबक्कर, वैभवी कदम, साक्षी नरे, दीक्षिता पाताडे तसेच नितीन घागरे, दीपेश मेस्त्री यांचा उल्लेखनीय सहभाग लाभला.

सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माननीय कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी, मुंबई विद्यापीठ यांची उपस्थिती लाभली होती. तसेच माननीय उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ. अजय भामरे, प्र-कुलगुरू हे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विनीत म्हणून प्रा. डॉ. बळीराम गायकवाड, संचालक व डॉ. प्रसाद कारंडे, कुलसचिव यांची उपस्थिती लाभली.

सदर स्पर्धेतील पारितोषिक वितरण समारंभ प्रसिद्ध शाहिर नंदीप उमप यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व पारितोषिक प्रदान करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला.

या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माननीय संजय मिराशी, माननीय खजिनदार विद्यानंद परब, माननीय सचिव समीर बावकर तसेच महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य नितेश सारंग, प्राध्यापक अच्युत कांबळी तसेच इतर सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!