पंचशील विकास मंडळ खारेपाटण यांच्या वतीने सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक यशवंत कांबळे यांचा सत्कार संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : शेर्पे, ता. कणकवली या गावचे रहिवाशी व बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या १२ गाव संघटनेचे माजी अध्यक्ष तथा प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे सेवेतून नुकतेच वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले प्राथमिक शिक्षक यशवंत रामचंद्र कांबळे यांचा नुकताच खारेपाटण येथील पंचशील विकास मंडळ व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्ध विहार येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला खारेपाटण जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्या प्राची ईसवलकर व पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंत कांबळे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे अध्यक्ष भरत रघुनाथ पाटणकर व संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा संकिता पाटणकर, बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे सचिव सागर पोमेडकर, मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटणकर, खारेपाटण ग्रा. पं. चे माजी सदस्य योगेश पाटणकर, महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सायली तुरळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

“श्री यशवंत कांबळे यांनी शिक्षणा बरोबरच सामाजिक कार्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावली असून बौद्धजन सेवा संघटनेच्या अध्यक्ष पदावर काम करत असताना संघटनेला एकसंघ ठेवण्याबरोबरच समाजाला साजेसे असे काम त्यांनी काम केले असून पंचशील नगर येथील प्रत्येक कार्यक्रमात त्याचा सक्रीय सहभाग असतो.” असे भावपूर्ण गौरवोद्गार संघटनेचे माजी चिटणीस संतोष पाटणकर यांनी सत्कार कार्यक्रमात बोलताना काढले. यावेळी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुढील सेवानिवृत्त काळासाठी शुभेच्छा दिल्या. तर श्री. कांबळे यांनी पंचशील विकास मंडळाचे आभार व्यक्त करून “येथील नागरिकांनी दिलेल्या शुभेच्छा यशस्वी जीवन जगण्यासाठी कायमस्वरुपी स्मरणात राहतील”, असे सत्काराला उत्तर देताना सांगितले.

error: Content is protected !!