ज्येष्ठ शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते प्रताप सावंत यांचे निधन

शासकीय ठेकेदार हेमंत सावंत यांना पितृशोक

कणकवली (प्रतिनिधी) : भिरवंडे-बिवणेवाडी येथील प्रतिष्ठित नागरीक, ज्येष्ठ शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते प्रताप पांडूरंग सावंत उर्फ प्रताप भाई (77) यांचे गुरूवारी रात्री हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने कुटूंबावर मोठा आघात झाला असून भिरवंडेसह कनेडी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

प्रताप सावंत हे शिवसेनेच्या स्थापनेपासून पहिल्या फळीतील एकनिष्ठ शिवसैनिक होते. अखेरपर्यंत ते शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पाईक म्हणून कार्यरत राहीले. मुंबईत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत सेवेत असताना कामगार चळवळीत सामील होवून कंपनीतील युनियनचे ते क्रियाशील कार्यकर्ते होते. कामगारांच्या हितासाठी ते झटले. एकनिष्ठ, निर्भिड आणि प्रामाणिक स्वभावाचे असलेले प्रताप सावंत हे सामाजिक कार्यात देखील अग्रेसर होते. सेवानिवृत्तीनंतर आपल्या मुळ भिरवंडे या जन्मगावी ते आले. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाच्या शालेय समितीवर त्यांनी कोषाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम करून ठसा उमटवला. प्रताप सावंत यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी भिरवंडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे, पूतणे असा परिवार आहे. शासकीय ठेकेदार हेमंत सावंत यांचे ते वडिल तर पत्रकार संजोग सावंत यांचे ते काका होत.

error: Content is protected !!