बांदा (प्रतिनिधी) : बांदा उभाबाजार येथिल रहिवासी सामाजिक कार्यकर्ते सदानंद रघुनाथ महाजन (वय ८२) यांचे आज शुक्रवारी पहाटे ४ वाजता अल्पशा आजाराने गोवा-बांबोळी रुग्णालयात दु:खद निधन झाले. आज सायंकाळी बांदा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
ते येथील खेमराज शाळेच्या स्कूल कमिटी व समन्वय समितीचे सदस्य होते. तसेच बांदा नट वाचनालयाचे सभासद होते. त्यांचा बांदा शहरातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय सहभाग होता.












