छ.शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
तर प्रकाश झोतातातील भव्य कबड्डी स्पर्धेचा थरार..
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगीवे या गावातील शिवगर्जना मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या उभारणी कामाचा शुभारंभ करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद व बांधकाम व वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार,भाजप तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर,नवनिर्वाचित जिल्हापरिषद सदस्य प्राची ईसवलकर,पं.स सदस्य गुरुप्रसाद शिंदे, राजेश जाधव, नडगीवे सरपंच सौ माधवी मण्यार, उपसरपंच भूषण कांबळे, मंडळाचे अध्यक्ष अमित सावंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या उभारणी कामाचा शुभारंभ जि.प.सदस्य सौ प्राची ईसवलकर व पं.स.सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी नवनिर्वाचित जि.प.आणि पं.स सदस्य यांचा शिवगर्जना मित्र मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह आणि पुषगुच्छ देऊन मंडळाचे अध्यक्ष अमित सावंत यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
सलग दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात महिलांसाठी हळदी कुंकू व होम मिनिस्टर तर लहान मुलांचे संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.व मंडळाच्या वतीने शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.तर दुसऱ्या दिवशी शिवगर्जना मित्र मंडळाच्या वतीने विद्युत प्रकाश झोतातातील भव्य नाईट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घघाटन साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे मालक श्री मुद्रस यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवगर्जना मित्र मंडळ नडगीवे यांच्या वतीने सलग ५ वर्षे शिवजयंती उत्सव व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावचे माजी सरपंच अमित मांजरेकर,उपसरपंच भावेश कर्ले,अमित सावंत,संजय मुद्रस,विनायक मण्यार सचिन तळेकर व स्थानिक ग्रामस्थानी मोलाचे सहकार्य केले.













