पालकमंत्रांच्या संकल्पनेतून कणकवलीत 27 फेब्रुवारी रोजी दुर्धर आजारांवर मोफत आरोग्य शिबीर

लाभ घेण्याचे जि प सदस्य प्रमोद रावराणे यांचे आवाहन

वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात फिजिशियन,हृदयरोग,मेंदू विकार,बालरोग, शल्यचिकित्सक,अस्थिरोग,पोटाचे विकार,कान, नाक, घसा,दंतविकार, नेत्रविकार,त्वचारोग इत्यादी आजारांचे विशेष तज्ज्ञ डॉक्ट्रर मार्फत यांच्यामार्फत रुग्ण तपासणी व मोफत उपचार दिले जाणार आहेत.

या शिबिराबाबत ग्रामस्तरावर प्रचार व प्रसिद्धी करणे कार्यक्षेत्रातील रुग्णांना माहिती देणे शिबिराच्या ठिकाणी गंभीर आजारी रुग्ण गरोदर माता लहान बालकांना ज्ञान करण्यासाठी 102 रुग्णवाहिकेमार्फत नियोजन करून कोळपे जि प मतदार संघातील सर्व गावातील जास्तीत जास्त गरजूंना या शिबिराचा लाभ देण्यासाठी कोळपे जि प मतदार संघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रनिहाय दिनांक 25 फेब्रुवारी रोजी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या संधीचा लाभ जास्तीत जास्त ग्रामस्थांनी घ्यावा.असे आवाहन जि प सदस्य प्रमोद रावराणे यांनी केले आहे.

error: Content is protected !!