वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या प्रशालेत माहितीपटाच्या आधारे विद्यार्थ्यांनी अनुभवला गुरु तेग बहादुरजी यांचा ज्वलंत इतिहास

‘हिंद दी चादर’ गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त प्रशालेत निबंध, वक्तृत्व स्पर्धांसह विविध कार्यक्रम संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : ‘हिंद दी चादर’ गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय, श्री. जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात श्री गुरु तेग बहादुरजी यांच्या जीवनकालावर दि. १७ फेब्रुवारी रोजी निबंध स्पर्धा तर दि. २१ फेब्रुवारी रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच दि. १८ व २३ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. शिवाय परिपाठाच्या वेळी सकाळी ९ वाजता त्यांच्या जीवनपटावर आधारित भक्ती गीताचे सामुहिक गायन करण्यात आले. दि. २४ फेब्रुवारी रोजी गुरु तेग बहादुर जी यांच्या जीवनावर दाखवलेल्या जीवनपटावर आधारित ५० प्रश्नांची बहुपर्यायी प्रश्नांच्या स्पर्धेचे प्रशालेत आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व इयत्तांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे नियोजन शिक्षक मंदार चोरगे यांनी तर जिवनपट व सामुहीक गायन स्पर्धेचे नियोजन योगेंद्र चव्हाण यांनी तर बहुपर्यायी प्रश्न स्पर्धेचे नियोजन सर्व इयत्तांच्या वर्ग शिक्षकांनी केले.

यावेळी गटशिक्षणाधिकारी अशोक वडर, पं. स. वैभववाडीचे प्रशासकीय अधिकारी संतोष टक्के, प्रशालेचे मुख्याध्यापक बी. एस. नादकर, प्रशालेचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!