जि. प. केंद्र शाळा खारेपाटण नं. १ चे वार्षिक स्नेहसंमेलन दि. २७ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी

आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

फूड फेस्टिवल सह विविध स्पर्धांचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ च्या शालेय विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम व वार्षिक बक्षिस वितरण गुणगौरव समारंभ शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी व शनिवार दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे उद्घघाटन आमदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर “फूड फेस्टिवल” सह या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आकर्षण असणार असल्याची माहिती खारेपाटण जि. प. केंद्र शाळा नं. १ चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

राज्यातील आदर्श मॉडेल स्कूल म्हणून ओळख असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण जि. प. केंद्र शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन हे सलग दोन दिवस होणार असून आमदार निलेश राणे यांसह शिवसेना उपनेते संजय आंग्रे, माजी जि. प. सदस्य व वित्त व बाधकाम सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार, भाजप तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर, शिवसेना तालुका अध्यक्ष मंगेश गुरव, नवनिर्वाचित जि. प. सदस्य प्राची ईसवलकर, पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, गट शिक्षण अधिकारी किशोर गवस आदी मान्यवर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी या वार्षिक स्नेसमेलन कार्यक्रम व फूड फेस्टिवल चे उद्घघाटन सायं. ५.०० वाजता आमदार डॉ. निलेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे.

शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ५.३० वा. शालेय विद्यार्थ्यांच्या फूड फेस्टिवल स्टॉलचे उद्घघाटन सायं. ६.३० वाजता रांगोळी दालनाचे उद्घघाटन सायं. ७.०० वा. शालेय विद्यार्थी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, सायं. ७.३० वाकता शिशुविहार व अंगणवाडी लहान मुलांचे संस्कृतिक कार्यक्रम रात्री ८.३० वा. शालेय विद्यार्थी रेकॉर्ड डान्स स्पर्धा तर रात्री ९.३० वा. खुला गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा तसेच शनिवार दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी स. १०.३० वा. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, दु. १२.३० वा. स्नेहभोजन सायं. ५.०० पालक व बचत चट महिला फूड फेस्टिवलचे उद्घाघाटन, सायं. ७.०० वा. शालेय या विद्यार्थी स्पर्धा पारितोषिक वितरण रात्री ९.०० वाजता शालेय विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर होणार आहेत.

तसेच या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमच्या निमित्ताने फूड फेस्टिवल स्टॉल स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा व रेकॉर्ड डान्स स्पर्धा शालेय व खुल्या अशा दोन गटात घेण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकांना विविध रोख रकमेची आकर्षक बक्षीसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं. १ च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्राप्ती कट्टी, उपाध्यक्ष प्रियंका गुरव, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, समिती सदस्य मंगेश ब्रम्हदंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!