खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सन २०२५-२६ च्या गणित प्राविण्य परीक्षेत शेठ न. म. विद्यालय, खारेपाटण या प्रशालेचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी रेवण अनंत राऊळ याने उल्लेखनीय यश संपादन केले असून त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
रेवण याने या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवत प्रशालेचे तसेच खारेपाटण परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. रेवणच्या या यशामागे त्याची सातत्यपूर्ण मेहनत तसेच अभ्यासातील चिकाटी आणि प्रशालेतील सहाय्यक शिक्षिका सौ. भोर व सौ. अमृते यांचे मार्गदर्शन लाभदायक ठरले.
रेवणच्या या उज्वल यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर सर्व विश्वस्त व प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व शिक्षकवृंद तसेच पालकांनी रेवणचे अभिनंदन करून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रेवणच्या या यशामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी व्यक्त केली आहे.











