वराडकर हायस्कूल कट्टाचे कलाशिक्षक समिर चांदरकर कला गौरव पुरस्काराने सन्मानित

आचरा (प्रतिनिधी) : देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, देवरुख DeCAD आयोजित “संकल्पन २०२६” या १९ व्या वार्षिक कला प्रदर्शनाचा उद्घाटन कार्यक्रम रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न झाला. या वार्षिक कला प्रदर्शनाच्या अनुषंगाने DeCAD मार्फत दिला जाणारा वार्षिक “कला गौरव पुरस्कार” वराडकर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कट्टाचे मालवणचे कला शिक्षक समिर चांदरकर यांना DeCAD चे सचिव विजय विरकर, कुडलय्या हिरेमठ (प्रसिद्ध चित्रकार, पुणे), प्रफुल्ल सातोकर (सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथील प्राध्यापक आणि प्रख्यात कलाकार), DeCAD चे प्राचार्य रणजीत मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व रोख रक्कम रुपये ५०००/- असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव न मागवता गेल्या पंचवीस वर्षातील कला व शैक्षणिक क्षेत्रातील केलेल्या कामाची दखल घेत DeCAD कला महाविद्यालयाने मला दिलेला हा पुरस्कार माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील तसेच DeCAD मार्फत मिळालेला हा “कला गौरव पुरस्कार” माझ्यासाठी नेहमीच संस्मरणीय राहील, अशी भावना समिर चांदरकर यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी कला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक पालक विद्यार्थी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!