१ मे महाराष्ट्र दिनी केंद्र शाळा नाधवडेने जपली सामाजिक बांधिलकी

प्रशालेतील कॅन्सर ग्रस्त विद्यार्थीनीला शाळेमार्फत मदतीचा हात

वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी तालुक्यातील केंद्र शाळा नाधवडे या शाळेतील इयत्ता पहिलीची विद्यार्थीनी कु.वेदिका नथुराम रांबाडे ही कॅन्सर सारख्या असाध्य आजाराने त्रस्त असल्याने मुंबई येथील टाटा रुग्णालय मध्यें उपचार घेत आहे म्हणून आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने केंद्र शाळा नाधवडे शाळेतर्फे रुपये दहा हजार चा चेक कुटुंबायांकडे सुपुर्द करण्यात आला यावेळी शिक्षक नेते शरद नारकर, जाधव मॅडम व माने सर तसेच शाळेतील इतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!