कोर्टात खेचिन…!

वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या लेखणीतील मालवणी नाटक लवकरच भेटीला

कणकवली (प्रतिनिधी): कोकण म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडी येते ती मालवणी आणि जेवढा मालवणी माणूस गोड आहे तेवढीच त्याच्या तोंडून बोलली जाणारी मालवणी बोली भाषा मालवणी भाषा वळवावी तशी वळते याच उत्तम उदाहरण म्हणजे मच्छिंद्रनाथ कांबळी यांनी वस्रहरणाच्या माध्यमातून मालवणी भाषा आपल्या वाणीतून प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचवली आज या मालवणी भाषेची भुरळ हि प्रत्येकाला पडलेली आपल्याला दिसून येते. प्रत्येक क्षेत्रात आज मालवणी माणूस न मालवणी भाषेची कमाल पाहायला मिळते याच मालवणी भाषेला आपल्या लेखणीतून सातासमुद्रापार नेण्याचं महान कार्य केलंय ते वस्त्रहरणकार लेखक गंगाराम गवाणकर यांनी त्यांच्याच लेखणीतील एक नव कोर धम्माल विनोदी मालवणी नाटक वेगवेगळ्या टीव्ही सिरीयल वरील लोकप्रिय कलाकार हौशी इरसाल 15 पात्रांच्या संचात अमर जवान क्रिएशन निर्मित निर्माते जगदीश लाडू गवस घेऊन येत आहेत.
वेंगुर्ला येथे आय टी आय विभागाच्या प्राचार्य पदी असून देखील कलेची आवड असलेले मालवणी भाषेवर नितांत प्रेम असणारे एक अनुभवी कलाप्रेमी आहेत. जगदीश गवस यांचे वडील लाडू वीरू गवस हे भारतीय सेनादलात कार्यरत होते. दहा वर्षांच्या सैनिकी काळात त्यांना रक्षा मेटल १९६५ सैन्य सेवा मेडल, समरसेवा स्टार १९६५ देऊन सन्मानित करण्यात आले होते. बांगलादेशाच्या वीरगतीप्राप्त सैनिकांच्या स्तंभात लाडू गवस यांचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले गेले. नेतर्डे गावात ते “अण्णा” या नावाने परिचित होते. त्यांना भजन आणि संगीत नाटक यामध्ये जास्त रस होता. वयाच्या पाचव्या वर्षापासून संगीत नाटकांमध्ये ते काम करू लागले या नेतर्डे गावात त्यांच्या घरासमोर त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. त्यांच्या जवळूनच मिळालेला कलेचा वारसा पुढे नेण्याचे काम त्यांचे पुत्र जगदीश लाडु गवस करत आहेत ते स्वतः एक तबला विशारद आहेत. धावपळीच्या जीवनात देखील असा कलाप्रेमी मिळणं कठीण मालवणी माणूस खेकड्याच्या वृत्तीचा नेहमी मागे खेचण्याचा प्रयत्न्न करतो हि उक्ती आता नाश पावत चाललीय याच उत्तम उदाहरण म्हणजे निर्माते जगदीश गवस कोकणच्या मातीतील १५ फक्कड मालवणी कलाकारांना एकत्र घेऊन त्यांनी हे निर्मितीचे शिवधनुष्य पेलले आहे. या नाटकाचे दिग्दर्शन प्रा. शेखर गवस हे करत असून आज अनेक वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहेत. स्नेहांश एंटरटेनमेंट च्या माध्यमातून अनेक नाटक, एकांकिका, शॉर्टफिल्म, एल्बम साँग या आणि अश्या अनेक कलाकृती आपल्या भेटीला घेऊन येत आले. त्यांच्या दिग्दर्शनातील एकांकिका,शॉर्टफिल्म यांना जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय,नॅशनल,इंटरनॅशनल स्तरावर पारितोषिके मिळाली आहेत. आता हे त्रिकुट “कोर्टात खेचिन” हि नवीन मालवणी, विनोदी, खुसखुशीत नाट्यकृती आपल्या भेटीला घेऊन येत आहेत. या नाटकाचे प्रयोग हे मे २०२३ च्या शेवटच्या आठवड्या पासून कोकणात सुरु होणार असून वस्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या मार्गदर्शना खाली ५०० हुन अधिक प्रयोग करून त्याहीपेक्षा उंच झेप घेण्याची तयारी निर्माते आणि सहकलाकारांनी दर्शवली. या मालवणी कलाकृतीचा मालवणी माणसाने आस्वाद घ्यावा नाय तर… “कोर्टात खेचिन” अश्या मालवणी विनोदी शैलीतून लेखक गंगाराम गवाणकर यांनी नाट्यप्रेमींना आवाहन केले आहे

error: Content is protected !!