योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही जिल्ह्यातील बागायतदारांच्या पाठीशी – जिल्हाध्यक्ष अबिद नाईक
कणकवली (प्रतिनिधी) : यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्यासह काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाच्या प्राथमिक अहवालानुसार सुमारे 85 ते 90% नुकसान झालेले आहे. शासन सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे नुकसान मान्य करत असून या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत शासन कटिबद्ध आहे. बागायतदारांच्या मागण्या संदर्भात शासन सकारात्मक असल्याने जिल्ह्यातील बागायतदारांना निश्चितच भरपाई मिळेल. जिल्ह्यातील बागायतदारांबाबत शासन सकारात्मक असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी म्हटले आहे.
यावर्षी सिंधुदुर्ग मध्ये आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काजू पिकाची ही झालेले नुकसान जिल्ह्यातील बागातदारांना अडचणीत आणणारे आहे.आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदारांनी नुकसान भरपाई मागितली नव्हती बागायतदारांनी फवारणी व इतर केलेला खर्च वाया गेला असून आंबा व काजू यावर असलेले जिल्ह्याचे अर्थकारण पूर्ण धुळीस मिळाले आहे जिल्ह्यातील आंबा व काजू यामुळे आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे प्रशासनाने पाहणी केल्यानंतर 90 टक्के नुकसानीचा अहवाल सादर केला आहे त्यामुळे जिल्ह्यातील या फळबागायतदारांना योग्य भरपाई मिळावी यासाठी आपण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. तसेच कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची भेट घेत निवेदन दिले. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे जिल्ह्यातील बागातदारांच्या झालेल्या नुकसानीबाबत सकारात्मक असून त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत ही चर्चा केली आहे. प्रशासन पातळीवर त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार तातडीने नुकसानीची पाहणी करून सुमारे 85 ते 90 टक्के होऊन अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर झाला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याची भूमिका घेतली आहे. किंबहुना जिल्ह्यातील बागायतदारांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण बागायतदारांसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.
पालकमंत्री नितेश राणे हे सरकार मध्ये असतानाही येथील बागातदारांसोबत कायम राहिले आहेत. त्यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे जिल्ह्यातील बागायतदारांना निश्चितच चांगल्या प्रकारे भरपाई मिळेल यात कोणतीही शंका नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्हीही बागायतदारांसोबत आहोत. जिल्ह्यातील बागातदारांशी माझी ही चर्चा झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तामामा भरणे, पालकमंत्री नितेश राणे या सर्वांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत कायम आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळेच जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची वस्तुस्थितीदर्शक माहिती शासनापर्यंत पोहोचलेली आहे. या साऱ्या परिस्थितीत जिल्ह्यातील बागायतदारांना यावेळी चांगल्या प्रकारची भरपाई मिळेल यात कोणतीही शंका नाही. आपल्याकडील बागायतदार हा कधीही नुकसानीच्या नावाखाली नाहक मागणी करत नाही. मात्र यावेळी झालेले नुकसान बागायतदारांना मोठी आर्थिक अडचण निर्माण करणारे आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून मदत मिळावी ही बागायतदारांची भूमिका अत्यंत योग्य आहे. परंतु या बागायतदारांसोबत सरकार असताना आणि लवकरच योग्य भरपाई जाहीर केली जाणार असे श्री नाईक यांनी म्हटले आहे.











