जागतिक महिला दिनानिमित्त पदर महिला प्रतिष्ठानचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त माजी नगराध्यक्ष समिर नलावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पदर महिला प्रतिष्ठानतर्फे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या गौरवगीताने करण्यात आली.

कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्रज्ञाताई ढवण, पदर महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण, उपाध्यक्षा हर्षदा गवाणकर, नगरसेविका सुप्रिया नलावडे, प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, आर्या राणे, जिल्हा व्यसनमुक्ती समितीच्या अध्यक्षा अर्पिता मुंबरकर आणि विद्याताई घाणेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

पदर महिला प्रतिष्ठानतर्फे सलग दोन दिवस महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक मानसी मेस्त्री, द्वितीय क्रमांक पल्लवी मुणगेकर, तर तृतीय क्रमांक नेहा शंकरदास यांनी मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिक कविता अबुलकर, मंजिरी वारे आणि कामिनी कसालकर यांना देण्यात आले. स्पर्धेतील सर्व सहभागी महिलांना प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

यानंतर महिलांसाठी फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमात महिलांच्या आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि सुरक्षिततेविषयी मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली. मानसशास्त्रीय समुपदेशक कावेरी कासरलकर यांनी “मनाचे ओझे कमी करण्यासाठी – एक सुरक्षित संवाद” या विषयावर महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्यांवर मार्गदर्शन केले. तसेच कुष्ठरोग निर्मूलन अधिकारी प्रशांत बुचडे यांनी कुष्ठरोग प्रतिबंध व त्याविषयी घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती दिली. दीपिका पावसकर यांनी महिलांनी स्वतःचे स्त्रीत्व जपत जीवनात आलेल्या अनुभवांमधून उद्योग क्षेत्रात कशी प्रगती साधता येते याविषयी मार्गदर्शन केले तसेच मासिक पाळीदरम्यान घ्यावयाच्या आरोग्यविषयक काळजीबाबत माहिती दिली.

सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात वसुधा माने यांनी “ओंकार प्रधान” या गाण्याने केली. जिल्हा व्यसनमुक्ती समितीच्या अध्यक्षा अर्पिता मुंबरकर यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.

यानंतर विविध नृत्य व कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. वेणू कला मंदिरच्या याज्ञवी कोदे, आरोही ठाकूर आणि राही ठाकूर यांनी गणेश वंदना सादर केली तसेच माय भवानी या गीतावर तलवार नृत्य सादर केले. कनक ग्रुपने कोळी नृत्य सादर केले.

रंगखांब कणकवलीच्या अंकिता तेजम, नम्रता तेजम, साक्षी जाधव, सुषमा नायर आणि गौरी खोत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित नृत्यनाट्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचप्रमाणे रंगीला मारो ढोलना या गीतावरही नृत्य सादर केले.

भारती पाटील, मीना गडेकर आणि सुषमा पोटफोडे यांनी वेसावची पारू – रुपेरी वाळू सोनेरी लाटा या गाण्यावर नृत्य केले. मेहक चव्हाण यांनी साउथ इंडियन रिमिक्सवर नृत्य सादर केले. प्रियाली कोदे, स्वानंदी कोदे आणि याज्ञवी कोदे यांनी एक दोन तीन, झुमके ठुमके,काहे छेडे छेड मोहे या गीतांवर आकर्षक नृत्य सादर केले.

अंकुरम प्ले स्कूलच्या अनुष्का पडते, प्रतिक्षा सावंत, चैताली भिसे, सुमेधा खटावकर, अर्चना गावडे आणि जान्हवी देवस्थळी यांनी दिलखेचक नृत्य करत रसिकांची मने जिंकली. साज सख्या प्रणाली चव्हाण, अनुष्का पडते, दिशा राणे, मीना गडेकर, कविता अबुलकर आणि स्मिता जोगळे यांनी डिस्को स्टेशन डिस्को, लैला मैं लैला, आप जैसा कोई….अशी डिस्को नृत्य सादर केली.

मेघा सावंत, साक्षी आळवे, स्वाती काणेकर, किर्ती सावंत, सेजल बागवे, प्रतीक्षा कदम, साक्षी राणे, मिलन सावंत आणि संतोषी आळवे यांनी लेझीम नृत्यातून गणेश वंदना सादर केली.

स्वाती गोखले (बांधकरवाडी) यांच्या ग्रुपने जन्म बाईचा या गीतावर नृत्य सादर केले. प्रणया मेस्त्री, दुर्वा म्हापणकर, सुमन कदम, संचिता कासले, आरती शिंगाडे आणि प्रमिला मालंडकर यांनी मी हाय कोली या नृत्यावर सादरीकरण केले. दर्शना पाताडे यांनी कविता वाचन केले. आरती शिंगाडे यांनी आदिवासी नृत्य सादर केले तर ऋचा परब हिने कोळी नृत्य सादर केले. निधी कदम हिने मोनो ॲक्ट सादर केला.

भूमिका जावडेकर, दुर्वा गडेकर, मेहेक चव्हाण आणि सविता यांनी बॉलिवूड रिमिक्स सादर करून रसिकांची मने जिंकली. सान्वी म्हापनकर, शिंगाडे आणि संस्कृती खटावकर यांनी एकपात्री अभिनय सादर केला.

यानंतर फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. यात गार्गी कामत हिने बोहारीनची वेशभूषा साकारत सुया घे ग बाई…दाभण घे या गाण्यावर अभिनय करत प्रथम क्रमांक मिळवला. दिशा अंधारी हिने लहान मुलीची वेशभूषा करत द्वितीय क्रमांक मिळवला. कविता अबुलकर यांनी स्मिता पाटील यांची भूमिका साकारत जांभूळ पिकल्या झाडाखाली गाण्याने तृतीय क्रमांक पटकावला. पूजा माणगावकर यांनी गंगुबाई मॅट्रिक पास सादर करत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले तर सोनाली परब यांनी बुमरो बुमरो या गाण्यावर नृत्य सादर करत काश्मिर की कली साकारली आणि उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक पटकावले.

अश्विनी फॅशन डिझाईनच्या अक्षता खांबाळेकर आणि त्यांच्या मुलींनी आकर्षक फॅशन शो सादर केला. या फॅशन शो मध्ये त्यांच्या मुलींनी स्वतः तयार केलेले कपडे परिधान केले होते. जर कोणी गरीब होत कडून मुलगी जीला फॅशन शो चे शिक्षण घ्यायचे आहे परंतु आर्थिक परिस्थितीमुळे घेता येत नसेल तर अशा मुलींना मोफत शिक्षण देण्याचा शब्द अश्विनी फॅशन डिझाईनच्या अक्षता खांबाळेकर यांनी दिला आहे.

या कार्यक्रमात कणकवली तालुक्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रख्यात डॉक्टर व महिला क्रिकेटपटू प्राजक्ता नाचणे-तेली, युट्युबच्या माध्यमातून आणि मालवणी भाषा बोलत लोकांच्या मनामनापर्यंत पोचत लोकप्रिय झालेल्या निशाताई केळुसकर, अंकुरम प्ले स्कूलच्या माध्यमातून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या गायत्री देवळी तसेच लेखिका-कवयित्री रूपाली कदम यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह म्हणून साडी, श्रीफळ, गणेश प्रतिमा आणि पदर महिला प्रतिष्ठानचे प्रमाणपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रणाली चव्हाण, पूजा माणगावकर, सोनाली परब आणि मेघा गांगण यांनी रिमिक्स नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

गेल्या वीस वर्षांपासून सहकार्य करणारे साऊंड सिस्टीमचे डंबे, लाईट व्यवस्थापक सुनील आजगावकर, लक्ष्मी विष्णू हॉलचे संदीप आचरेकर तसेच फोटोग्राफर प्रथमेश जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

लकी ड्रॉच्या माध्यमातून शेवटपर्यंत उपस्थित राहिलेल्या प्रेक्षकांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेकांनी मोलाचे सहकार्य केले. प्रियाली कोदे यांनी संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केले. श्रेया बांदेकर, विनिता राणे, विणा राणे आणि आरती राणे यांनी फनी गेम्सची जबाबदारी पार पाडली. दिशा अंधारी, आस्मा बागवान आणि संध्या पोरे यांनी पाककला स्पर्धेचे नियोजन केले. लीना काळसेकर आणि अंकिता कर्पे यांनी बक्षिसांचे नियोजन केले. तसेच राजश्री रावराणे, साक्षी वाळके, भारती पाटील, संपदा पारकर, उमा परब, उज्वला ताम्हणेकर, आस्मा बागवान,संजना सदडेकर, स्वप्नाली जाधव,सानिका परब, बिट्टू आणि पदर महिला प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

महिला दिन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पदर महिला प्रतिष्ठानचे संस्थापक समीर नलावडे यांचे बहुमोल सहकार्य लाभले. भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता ताई कोरगावकर यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. महिला प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीने आयोजकांचा उत्साह वाढला.

दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साजसखी प्रणाली चव्हाण यांनी उत्कृष्टरीत्या केले.

error: Content is protected !!