स्व. संजय नाईक जयंती दिनानिमित्त ५ किमी स्मृती दौड उत्साहात संपन्न

“ब्युटीज ऑन व्हिल्स” व संजय नाईक स्मृती प्रतिष्ठानचे आयोजन

चौके (प्रतिनिधी) : ८ मार्च २०२६ रोजी स्वर्गीय संजय नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली ५ किमी स्मृती दौड उत्साहात पार पडली. स्व. संजय नाईक स्मृतीस्थळ पेंडूर ते ग्रामीण रुग्णालय कट्टा आणि पुन्हा स्मृतीस्थळापर्यंत अशी सुमारे ५ किलोमीटरची दौड आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. संजय नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्मृती दौडीचा शुभारंभ बालरोग तज्ज्ञ डॉ. जयसिंहराव राणे आणि डॉ. बापू परब यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास डॉ. जयसिंहराव राणे, डॉ. बापू परब, डॉ. सुशील परब, डॉ. मिलिंद बोर्डवेकर, डॉ. गिरीश बोर्डवेकर, डॉ. अनघा बोर्डवेकर, स्नेहा बोर्डवेकर, डॉ. तुषार वेर्लेकर, डॉ. मृण्मयी परब, माजी सैनिक हेमंत कनयाळकर, सुशील राणे, उद्योजक भाई सावंत, वरची गुरामवाडीचे माजी सरपंच सतीश वाईरकर, महेश नाईक (अध्यक्ष संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान पेंडूर), श्रावणी नाईक, संदेश नाईक, संदीप नाईक, पप्पू राणे, संजय पेंडूरकर, अमित सावंत, सुमित सावंत, डॉ. सोमनाथ परब तसेच “ब्युटीज ऑन व्हिल्स”चे सर्व सदस्य आणि नाईक परिवारातील सर्व सदस्य व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्मृती दौडीत वराडकर हायस्कूल कट्टा, न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर तसेच वराड हायस्कूल, वराडकर इंगग्लिंश मेडीयम येथील सुमारे १५० विद्यार्थी व शिक्षकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

स्मृती दौड मध्ये सहभागी झालेल्या सर्व रनर्सना संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान मार्फत प्रमाणपत्र व टी-शर्ट प्रदान करण्यात आले. टी-शर्टसाठी उद्योजक भाई सावंत आणि माजी सरपंच सतीश वाईरकर यांनी प्रायोजकत्व दिले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोमनाथ परब व गौरव नाईक सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन महेश नाईक (संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान पेंडूर) यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी स्व. संजय नाईक यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन केले. सामाजिक बांधिलकी, एकोपा आणि सेवाभावाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी करण्यात सहकार्य केले.

error: Content is protected !!